सोन्या-चांदी चे दर गगनाला…!

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २ महिन्यांपासून सराफ बाजार बंद होता. गेल्या काही दिवसांपूर्वी लॉक डाऊन च्या चौथ्या टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता करण्यात आली होती. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंसह इतर व्यवहारांना सशर्त सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानुसार सुवर्ण बाजार सुरु करण्यात आला.

कोरोनामुळे विदेशातून होणारी सोन्या-चांदीची आवक कमी झाल्यामुळे भावात कमालीची वाढ झाली आहे. या आठवड्यात चांदीचे भाव तब्बल ५० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर सोन्याचे भावदेखील ४८ हजर रुपये प्रति तोळ्याच्या घरात जाऊन पोहोचले आहेत.

मार्च महिन्याच्या लॉक डाऊन पासून ते सध्या सुरु असलेल्या अनलॉक दरम्यान सोन्याच्या भावात प्रति तोळा ३३० रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या भावात प्रतिकिलो ११ हजर रुपये इतकी वाढ झाली आहे.