भारत पेट्रोलियम कंपनीची डिलरशिप देण्याचे आमिष देत उकळले ८ लाख !

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील तिडके कॉलनीतील रहिवाशी असलेल्या व्यक्तीस अज्ञात सायबर चोरटयांनी भारत पेट्रोलियम कंपनीची डिलरशिप मिळवून देतो असे सांगत आमिष देऊन विश्वास संपादन केला. दरम्यान, फिर्यादीकडून वेळोवेळी संपर्क करून ८ लाख रुपये उकळले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र सुदामराव सोनवणे (वय ५६) हे सिव्हिल इंजिनीर असून, मातोश्रीनगर, एचडीएफसी बँकेच्या मागे तिडके कॉलनी या परिसरात राहतात. (दि.२ मे २०२०) रोजी पासून ते २०२१ या वर्षापर्यंत संशयित आरोपींनी फिर्यादीस आधी संपर्क केला व आमिष दिले. प्रथम बनावट वेबसाईट व व्हाट्सअँप या माध्यमांद्वारे संशयितांनी फिर्यादीस संपर्क करून, भारत पेट्रोलियम कंपनीची डिलरशिप देण्याचे खोटे आमिष दिले. त्यांनतर फिर्यादीकडून संशयितांनी वेळोवेळी कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा या बँक खात्यांवर एकूण ८ लाख रुपये उकळले.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: सिटीलिंकचे प्रवासी घटल्यामुळे अडीचशे २५० फेऱ्या कमी होणार

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790