खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि हातगाडे सायंकाळी ७ वाजेपर्यंतच !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालून दिले होते. यात हॉटेल्स आणि बार यांना ५० टक्के क्षमतेने ९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा दिली होती. मात्र याचा विपर्यास केला गेला. खरं तर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि हातगाडे यांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच आपला व्यवसाय सुरु ठेवता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.