अमेरिकेहून आलेल्या कोरोन संशयित तरुणाला दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अशातच दुबईहून आलेल्या कोरोन संशयित व्यक्तीला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय !
या व्यक्तीचे रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहेत. यापूर्वी इटली येथून आलेला २४ वर्षीय विद्यार्थी, इराणहून आलेला ४७ वर्षीय व्यक्ती यांना जिल्हा रूग्णालयात कोरोनाचे संशयित रूग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना आजार नसल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिला होता.
जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय पथकाकडून परदेशातून आलेल्या पर्यटकांची माहिती घेतली जात असून त्यांच्या घरी जाऊनही तपासणी केली जात आहे.
काल म्हणजेच ५ मार्च २०२० रोजी दुबईहून आलेल्या ज्या प्रवाशाला दाखल करण्यात आले आहे, त्यांना सर्दी आणि श्वसनाचा त्रास होत होता. ही लक्षणं दिसल्यामुळे त्यांना ताबडतोब कोरोना कक्षात दाखल करण्यात आलंय.