नाशिक: ..या अत्यावश्यक सेवांसाठी वेळेचे बंधन कायम – जिल्हाधिकारी सुरज मांढरे

नाशिक (प्रतिनिधी): शहरात किराणा, फळे तसेच दुध खरेदीसाठी लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत आणि गर्दी करत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सुचना जारी केल्या आहेत. यात भाजीपाला, फळे तसेच किराणा यांच्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 4 तसेच किरकोळ दुध विक्रीसाठी सकाळी 6 ते 7.30 तसेच सायंकाळी 4 ते 5.30 या वेळेचे बंधन कायम असणार आहे.

भाजीपाला, फळे तसेच किरण यासाठी लोकांची प्रचंड गर्दी वाढत आहे. हा प्रकार लॉकडाऊनच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारा आहे. त्यामुळेच जिल्हाधिकार्यांनी वेळेची बंधने कायम ठेवली आहेत. मात्र यात वैद्यकीय सेवा, वैद्यकीय आस्थापना आणि मेडिकल स्टोअर्स यांना ही बंधने लागू होणार नाही ! या आदेशांचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.