नाशिकला चक्रीवादळाचा अलर्ट मिळूनही रस्त्यांवर गर्दी कायम

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकला चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आला आहे. चक्रीवादळाचे सावट असताना, आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सुद्धा लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन सकाळीच केले होते.  या चक्रीवादळामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून या कालावधीत लोकांनी घराबाहेर पडू नये आणि घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन केलेले असतांना देखील नाशिकमध्ये नागरिक सर्रासपणे बाहेर फिरतांना दिसत आहे.