सीम कार्डमध्ये 4G एक्टीव्ह करण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये लंपास

नाशिक(प्रतिनिधी) : सीम कार्डमध्ये 4G एक्टीव्ह करून देण्याचे आमिष दाखवून फोन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पाथर्डी फाटा परिसरातील पार्कसाईट येथे काल बुधवार दि. ३ जुन रोजी घडला. या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या पत्नी शिल्पा विवेक जाखडे वय ३६, यांनी तक्रार नोंदविली आहे.

संशियिताने विवेक जाखडे यांस फोनद्वारे संपर्क करून सीम कार्ड 4G मध्ये एक्टीव्ह करणार असे आमिष दाखवून त्यांच्या नावी असलेल्या खात्याचा अॅक्सेस घेऊन खात्यावरील एकूण १,००,१३६ रुपये इतकी रक्कम लंपास केली. या प्रकरणी फोन द्वारे संपर्क केलेला संशियीत आणि फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या खात्यावरील रक्कम वर्ग झालेल्या खातेधारकांविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक देवराज बोरसे करत आहेत.