गर्भवती महिलांची तपासणी ICMR च्या निर्देशानुसार करावी : डॉ.पंकज आशिया

मालेगाव (प्रतिनिधी) :  कोविड-19 विषाणूचा वाढता संसर्ग पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.  मालेगावातील सद्यस्थिती पाहता मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मालेगाव क्षेत्रातील गर्भवती महिलांची तपासणी वैद्यकीय अधिक्षक, सामान्य रुग्णालय मालेगाव यांनी ICMR च्या निर्देशानुसार करावी. कोणत्याही प्रकारची टाळाटाळ होणार नाही असे निर्देश घटना व्यवस्थापक तथा इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.