मनसेकडून कोरोनाबाधितांसाठी हेल्पलाईन नंबर…..

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या बघता नागरिकांना मुलभूत सुविधा मिळणेसुद्धा आता कठीण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोरोनाबाधीतांच्या सेवेसाठी मदतीचा हात पुढे करत संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. मनसेच्या राजगड येथील संपर्क कार्यालयात ०२५३-२३१७७७८ या क्रमांकावर कॉल केल्यास संबंधित परिसरातील मनसे सैनिकांचा संपर्क क्रमांक मिळणार आहे. वरील क्रमांकावर संपर्क साधल्यास मनसेकडून योग्य टी मदत दिली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अनंता सुर्वांशी यांनी सांगितले.

कोरोनाबाधीतांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक कोरोनाबाधीतांना वेळेवर योग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेकडून कोरोनाबाधीतांच्या नातेवाईकांसाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास रुग्णांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत.