चौदा दिवस पूर्ण झाल्यामुळे जनरल वैद्य नगर येथील निर्बंध हटविले

नाशिक(प्रतिनिधी): शहरातील नाशिक पुणे रोड येथील जनरल वैद्य नगर येथे काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यामुळे हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषितही करण्यात आला होता. चौदा दिवसांसाठी या भागात निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता हे चौदा दिवस पूर्ण झाल्यामुळे हे निर्बंध हटविण्यात आले आहेत, असे नाशिक महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. असे असले तरीही लोकांनी स्वत:ची काळजी घ्यायची आहे.