अर्नब गोस्वामीविरुद्ध नाशिकमध्येही गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याबाबत आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल रिपब्लिक भारत चॅनल संपादक अर्नब गोस्वामी यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेजरोड येथील स्वप्नील दिलीप पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. “पुछता है भारत” या कार्यक्रमादरम्यात अर्नब गोस्वामी यांनी हे अनुद्गार काढले असे फिर्यादीत म्हंटले आहे.