BREAKING NEWS: नाशिक शहरात अजून दोन कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक (विशेष प्रतिनिधी): शहरात एका कोरोना पॉझिटिव्हवर उपचार सुरु असतानाच अजून दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नाशिक शहराचा धोका हा आता खऱ्या अर्थाने वाढला आहे. गोविंद नगर भागात काही दिवसांपूर्वी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात झाली होती. तोच आज आलेल्या अहवालांमध्ये नाशिक शहरातील अजून दोन पॉझिटिव्ह  रुग्ण आढळले आहेत. त्यात एक पोलीस अधिकारी असल्याचेही समजते.

कुठल्या भागातील आहेत हे रुग्ण..

या दोन पॉझिटिव्ह  रुग्णांमधील एक रुग्ण जेल रोड तर एक गंगापूर रोड येथील नवश्या गणपती परिसरातील आहे. त्यामुळे आता या परिसरात बंदोबस्त अजून कडेकोट करण्यात येणार आहे. नाशिक जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन वारंवार नागरिकांना आवाहन करत आहे की घराबाहेर पडू नका पण “सुशिक्षित अडाणी” लोक आजही घराबाहेर पडत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आता अजून कडक कारवाई करण्यात येणार आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून प्रशासनाला सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे…!