Breaking: नाशिकजवळ 11061 (DN)पवन एक्सप्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले; एकाचा मृत्यू तर काही प्रवासी जखमी

Breaking: नाशिकजवळ पवन एक्सप्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले; एकाचा मृत्यू तर काही प्रवासी जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड रेल्वे स्टेशन जवळ असणार्‍या लहवित-देवळाली दरम्यान ११०६१ (डाऊन) पवन एक्सप्रेसचे (डाऊन) १२ डबे रुळावरून घसरले आहेत.

दुपारी ३ वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला.

या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर काही प्रवासी जखमी आहे.

पवन एक्सप्रेस नाशिकच्या 12 km आधी रुळावरून खाली उतरल्याने हा मोठा अपघात झाला.

नाशिकजवळील लहवित – देवळाली स्थानकादरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर पवन एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरुन घसरल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून रेल्वे पोलिस, वैद्यकीय पथक घटनास्थळाकडे रवाना झाले.

रेल्वे प्रशासनाच्या विनंतीवरून प्रवाशांना हलविण्यासाठी एसटी महामंडळ आणि महानगरपालिका ट्रान्सपोर्टच्या बसेस पाठविण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे ॲम्बुलन्स आणि फायर ब्रिगेड च्या गाड्या रवाना झालेले आहेत.

जखमी प्रवाशांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आले आहेत. प्रवासी त्यावर संपर्क साधून मदत मागू शकतात.

हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. पण, रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर काही प्रवासी रेल्वेमध्ये अडकून पडले आहेत. त्यांच्यासाठी रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.

हेल्पलाईन नंबर्स पुढीलप्रमाणे:
पब्लिक हेल्पलाईन नंबर नाशिक 0253-2465816, हेल्पलाईन नंबर – 022 67455993, हेल्पलाईन नंबर (CSMT station TC office) – Railway : 55993, MTNL: 02222694040

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates