BREAKING: नाशिक शहरातील हुक्का पार्लर्सवर छापे.. क्राईम ब्रांचची धडक कारवाई !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सुलावाईनकडे जाणाऱ्या रोडवर हॉटेल बराको येथे व मुंबईनाका पोलीस स्टेशन हद्दीत सी.पी.4, या बारवर क्राईम ब्रांचने छापे टाकले असून हुक्का पार्लर्स उद्धवस्त केले आहेत. अशीच कारवाई कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरातही व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

नाशिक शहरातील गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सुलावाईनकडे जाणाऱ्या रोडवर हॉटेल बराको येथे व मुंबईनाका पोलीस स्टेशन हद्दीत सी.पी.4, या बारचे वरील टेरेसवर, सत्यम स्विटच्या वर, गोविंदनगर या ठिकाणी हुक्का पार्लर चालु असुन हुक्क्यामध्ये बंदी असलेल्या निकोटीन व सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थाचा वापर होत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. संग्रामसिंह निषाणदार, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा यांनी लागलीच गुन्हे शाखा युनिट क्र. 1 कडील पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व गुन्हेशाखा युनिट क्र. 2 कडील पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांना त्यांचे युनिट कडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची पथके तयार करुन मिळालेल्या बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करुन छापा कारवाई केली.

गुन्हे शाखा युनिट क्र. 1 कडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी छापा कारवाई मध्ये गंगापुर पोलीस स्टेशन हद्दीतील सुलावाईन्सरोड वरील हॉटेल बराको मध्ये हुक्का पार्लर चालु असल्याचे व त्या ठिकाणी हॉटेल मालक जितेंद्र साहेबराव निकम वय 36, रा. फ्लॅट नं.11, देवेंद्र हाईटस् बक्षी पार्क, पंचवटी, नाशिक हा बंदी असलेल्या सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थाचा ग्राहकांना हुक्क्यामध्ये पिण्यासाठी उपलब्ध करुन देतांना मिळून आल्याने हॉटेल मालक नामे जितेंद्र साहेबराव निकम व तेथे हुक्का पिण्यासाठी आलेल्या 23 इसमांना हुक्का पिण्यासाठी वापरण्यात येणारी बंदी असलेली सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थाचे 24 डबे व इतर साहित्य साधने अशा एकुण 57,271/- रु. कि.च्या मालासह ताब्यात घेवुन पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

तसेच गुन्हे शाखा युनिट क्र. 2 नाशिक शहर कडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी मुंबईनाका पोलीस स्टेशन हद्दीतील सी.पी. 4 या बारचे वरील टेरेसवर, सत्यम स्विट समोर गोविंदनगर येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी असलेल मॅनेजर रमीझ वाहब शेख वय 40 , रा. फ्लॅट नं. 17, सनसईन रोजेस बिल्डींग, वडाळारोड जेएमसीटी कॉलेज समोर, नाशिक हा हुक्का मध्ये बंदी असलेल्या सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ उपलब्ध करुन देवून तेथील वेटर इसम नामे देबांकन देबाशिस मुखर्जी वय 19, रा. फ्लॅट नं. 5 शानदिप अपार्टमेंट, आनंदनगर, पाथर्डीफाटा, नाशिक हा सदरचा सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ हुक्क्याद्वारे पिण्यासाठी पुरवित असतांना मिळून आला. तेंव्हा त्यांनी सदरचे हॉटेल मालकाचे नाव शुभांकर राजेश आनंद रा. गंगापुररोड नाशिक असे सांगीतले. छापा कारवाई मध्ये बंदी असलेला सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ व इतर साहित्य साधने असा किंमत रुपये 7,900 रुपये किंमतीचा मिळून आल्याने आल्याने मिळून आलेले मॅनेजर नामे रमीझ वाहब शेख व वेटर नामे दबांकन देबाशीस मुखर्जी तसेच हुक्का पिण्यासाठी आलेल्या 07 इसमांना ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी मुंबईनाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अशा प्रकारे संग्रामसिंह निशाणदार, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांना मिळालेल्या बातमीच्या अनुशंगाने गुन्हे शाखा युनिट क्र. 1 व 2 यांचे मार्फतीने गंगापुर पोलीस स्टेशन व मुंबईनाका पोलीस स्टेशन हद्दीत हुक्का पार्लरवर छापा टाकला असता सदर ठिकाणी असलेल्या हुक्का पार्लरमध्ये हुक्क्यामध्ये पिण्यासाठी बंदी असलेला तंबाखुजन्य पदार्थ उपलब्ध करुन देतांना एकुण 04 इसम मिळुन आले असुन हुक्का पिण्यासाठी आलेले एकुण 30 इसम मिळून आलेले आहेत. छापा कारवाई मध्ये एकुण 65,171/- रुपये किंमतीचा बंदी असलेल्या तंबाखुजन्य पदार्थ व इतर साहित्य साधने मिळून आल्याने वरील नमुद मिळुन आलेल्या इसमांना ताब्यात घेवुन त्यांना योग्य त्या पुढील कारवाईसाठी संबंधीत गंगापुर व मुंबईनाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर छापा कारवाई दरम्यान संग्रामसिंह निशाणदार, पोलीस उपआयुक्त  गुन्हे शाखा नाशिक शहर हे समक्ष उपस्थित होते.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस उप आयुक्त संग्रामसिंह निशाणदार, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र. 1 नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, व गुन्हे शाखा युनिट क्र. 2 कडील पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी व युनिट क्र. 1 व 2 कडील इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तीकरित्या केलेली आहे.