मुंबई (प्रतिनिधी) : लाईफ ऑफ पाय, बिल्लू, हिंदी मिडीयम, पिकू, पानसिंग तोमर अशा एकापेक्षा एक चित्रपटात दर्जेदार अभिनयाने आपल्या भूमिकांना वेगळा आयाम देणारा हरहुन्नरी बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी इरफानने अखेरच्या श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने काल त्याला मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथेच उपचारादरम्यान इरफानची प्राणज्योत मालवली. दोन वर्षांपासून ते न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने त्रस्त होता.
लोकप्रिय अभिनेता इरफान खान यांचं निधन
3 years ago