डांबर भेसळ विक्री करून विकणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; २८ लाखाचा माल जप्त

नाशिक: आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डांबर मध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या कारखान्याबाबात गुप्त माहिती पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांना मिळाली होती, या माहितीवरून पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भागात यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार तसेच गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी छापा टाकला..

मुंबई आग्रा हायवेवरील राधा कृष्ण हॉटेलजवळ प्रीमियम मार्केटजवळ हा प्रकार सुरु होता. या छाप्यात भेसळयुक्त डांबर तयार करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या टँकरचालक कारखान्याचा मालक असे एकूण पाच जणांना ताब्यात घेऊन दोन डांबराचे टँकर, एक जनरेटर व्हॅन, दाम्ब्रात मिक्स करण्याची सफेद पावडर असा तब्बल २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.