लाच घेतल्याप्रकरणी दोघा व्यवस्थापकांना अटक

नाशिक (प्रतिनिधी): सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढून देण्यासाठी आणि नियमित पगार देण्याच्या मोबदल्यात ‘एनडीएसटी’ च्या दोन व्यवस्थापकांनी लाच घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. नाशिक डीस्ट्रिक्ट सेकेंडरी टीचर्स अँड नॉन टिचिंग एम्प्लॉयी को.ऑप सोसायटी च्या दोन व्यवस्थापकांना आज (दि.१०) १९ हजार ७१५ रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पथकाने अटक केली. शाखा व्यवस्थापक शरद वामन आणि व्यवस्थापक जयप्रकाश रघुनाथ कुवर अशी त्यांची नावे आहेत.
गेल्या शुक्रवारी (दि.५) या दोघांनी तक्रारदाराकडे लाच मागितली. याप्रकरणात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार केली. आणि या पथकाने सापळा रचून तक्रारदाराकडून लाच घेतांना दोघांना अटक केली.

हे ही वाचा:  नाशिक पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर कोयताधाऱ्यांचा धिंगाणा