नाशिकचे अँटीजेन किट्स संपले!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वात महत्वाचे ठरणारे अँटीजेन टेस्ट किट्सचा तुटवडा निर्माण झाला आहे.

महापालिकेने मागवलेल्या १ लाख कीटपैकी ७५ हजार किट्स आत्तापर्यंत वापरण्यात आलेले आहेत. आणि १८ हजार किट्स जळगाव महापालिकेला परतीच्या बोलीवर देण्यात आले होते. मात्र ते किट्स अजून परत देण्यात आलेले नसल्याची बाब नाशिक महापालिकेने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.