नाशिक शहर: रविवारच्या (दि. ४ जुलै) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी…

नाशिक शहर: रविवारच्या (दि. ४ जुलै २०२१) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराच्या लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक महानगरपालिका,नाशिक सार्वजनिक आरोग्य विभाग रविवार दि :०४ जुलै २०२१  रोजी मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार आहे. नागरिकांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक : ०४ जुलै २०२१  रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सुद्धा काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अजून काही महिने तरी कोरोनाचे प्राथमिक नियम विसरून चालणार नाही.