नाशिक: साखरेचा ट्रक झाला पलटी; अंदाजे २५ लाखांचे झाले नुकसान

जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस गुप, नाशिक
नाशिक- पुणे महामार्गावर साखर घेऊन जाणाऱ्या ट्रक ला अपघात होऊन हा ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना घडली आहे.. या घटनेमध्ये अंदाजे 25 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

या अपघातात ट्रक चालक हा किरकोळ ज’खमी झाला आहे. विशाल सांगळे असे जखमी झालेल्या ट्रक ड्रायव्हरचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार सांगळे हे पुणे येथून गुजरातला साखर भरलेला ट्रक घेऊन जात होता. नाशिकरोड भागात समोरून अचानक चुकीच्या दिशेने आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाला. ट्रक रस्त्याच्या कडेला एका शेतात पलटी झाला या अपघात जवळ जवळ २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जी’वितहा’नी झालेली नाही. या भागात पुणे हायवे चार पदरी रस्त्याचे काम सुरू आहे. चेहेडी शिव पंपिंग जाणाऱ्या मार्गाकडे मोठ्या संख्येने नागरिक हे विरुद्ध दिशेच्या मार्गाचा अवलंब करत असतात. त्यामुळे छोट्या मोठ्या अपघात याठिकाणी वाढ झाली आहे, तर याठिकाणी ट्राफिक पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी देखील होत आहे.