ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या आमिषाने २ लाखांचा गंडा

नाशिक : शहरातील एका हॉटेलच्या चालकाला ऑनलाइन फुड डिलिव्हरी सुरू करण्याचा बनाव करत लबाडाने हॉटेल चालकास सव्वादोन लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी संशयिताविरुध्द सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल व्यावसायिक मोहन विष्णू मते (रा. मते वस्ती, आडगाव) यांनी ऑनलाइन फुड डिलिव्हरी सुरू करण्यासाठी इंटरनेटवर माहिती शोधून एका क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी लबाडाने त्यांना जाळ्यात अडकवत फसगत केली. दोन एप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्या सायबर गुन्हेगाराने मते यांच्याकडून त्यांच्या बँक खात्याची माहितीदेखील जाणून घेतली आणि ‘गुगल पे’च्या माध्यमातून ऑनलाईन २ लाख 3९ हजार ९७ रुपये इतकी रक्कम काढून घेतली