बुधवार सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत; गुरुवारी तरी पाणी पुरवठा होणार का ?

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी पावसाने जोरदार वाऱ्यासह चांगलीच हजेरी लावली. निसर्गचक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने गंगापूर पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या दोन्ही पंपिंग स्टेशनवरून होणारा रॉ वॉटर प्लांट बंद झाला आहे. तसेच मुकणे धारण पंपिंग स्टेशन येथील विद्युत पुरवठा बुधवारी दुपारी ३ वाजेपासून बंद करण्यात आला आहे.

त्यामुळे बुधवारी सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून गुरुवारी म्हणजेच 4 जून 2020 रोजी सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही असे नाशिक महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे.