नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नाशिक जिल्हा आरोग्य विभाग आता सज्ज झाला आहे. दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता, ऑक्सिजनची मोठी कमतरता भासली होती. अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे आता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आलेल्या संभाव्य तिसऱ्या लाटेत याचा सामना करण्यासाठी जिल्ह्याभरात 32 ऑक्सिजन प्लांट उभारण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.
त्यात नाशिक जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटच काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या प्लांटची क्षमता दोन मेट्रिक टन इतकी आहे.यामुळे जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा चांगला होईल. आणि इतरही रुग्णलायांमध्ये कमतरता भासू नये यासाठी तिथलेही प्लांट लवकरच सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिली आहे.