महाराष्ट्रात कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा २६ वर

राज्यातला कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा २६ वर गेलाय. यात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात असून पुण्यातल्या कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा हा १० झालाय. तर पुण्यापाठोपाठ मुंबईत कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. नागपूरातल्या रुग्णांची संख्या ही चार आहे तर ठाणे आणि अहमदनगरमध्ये कोरोनाचे प्रत्येकी एक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोना व्हायरसची संख्या राज्यात 26 झाली आहे.

शाळा ३१ मार्चपर्यंत बंद

राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय शासनाने दिला आहे. यामध्ये खासगी आणि सरकारी शाळांचा समावेश असेल. असे असले तरी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.