110 व्या अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेस पात्र उमेदवारांचे हॉल तिकीट 1 ऑगस्ट पर्यंत मिळणार

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत 110 व्या अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेस पात्र असणाऱ्या सर्व नियमित व माजी उमेदवारांची, 110 व्या अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2020 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने होणार असल्याचे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस.एस.भामरे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

या परिक्षेचे हॉलतिकीट 1 ऑगस्ट 2020 पर्यंत उपलब्ध होणार असून सर्व नियमित व माजी उमेदवारांनी परिक्षेच्या हॉल तिकीटाबाबत आपल्या आस्थापनेशी संपर्क साधावा. तसेच 110 व्या अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी (0253) 2363494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.