नाशिक हुक्का पार्टी: ५५ पुरुषांना न्यायालयीन तर आयोजक दोन महिलांना पोलिस कोठडी

हुक्का पार्टी: ५५ पुरुषांना न्यायालयीन तर आयोजक दोन महिलांना पोलिस कोठडी

नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी शहराजवळील त्रिंगलवाडी हद्दीतील माउंटन शॅडो या नामांकित रिसॉर्टवर शनिवारी रात्री नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा मारला होता.

या छाप्यात हुक्का पार्टी उद‌्ध्वस्त करून २ रिसॉर्ट मालक, व्यवस्थापक, मुंबईतील रेवत कंपनीचे तीन आयोजक सॅटर्डे नाईट पार्टीला उपस्थित आयोजक दोन महिलांसह १८ तरुणी, ५४ पुरुषांना अटक करण्यात आली होती.

या सर्व संशयितांना सोमवारी इगतपुरी न्यायालयात हजर केले.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता न्यायाधीश गिरी यांनी रिसॉर्ट चे मालक मनीष झवेरिया (रा. विलेपार्ले), महेंद्र शहा (रा. शरणपूर रोड, नाशिक), आयोजक रेवत कंपनीचे आशिष नरेंद्र छेडा (रा. दहिसर), रंजन रिटीका (रा. दहिसर), केतन गडा (रा. कांदिवली) अशा ५५ संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

या रिसॉर्टवर तरुणी उपलब्ध करून देणाऱ्या दोन संशयित महिलांना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पार्टीत उपस्थित असलेल्या १८ संशयित तरुणींना नाशिकच्या वात्सल्य महिला आधाराश्रमात पाठवण्यात आले. सरकारी वकील म्हणून अर्चना महाले यांनी काम पाहिले. शनिवारी रात्री हुक्का पार्टी व इतर गैरप्रकाराचा संशय असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार छापा टाकण्यात आला. या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त:
हुक्का पार्टीत वापरले वेगवेगळ्या रंगाचे सात हुक्का पिण्याचे भांडे, तंबाखूजन्य पदार्थ, वाइन बाटल्या, ७५ हजार रुपयांच्या २० महागड्या विदेशी मद्याच्या बाटल्या असा एकूण एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
इथे किराणा मालावर मिळतोय भरघोस Discount ! संधी चुकवू नका !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790