शिवसेना, सत्कार्यच्या दिनदर्शिकेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते प्रकाशन

NPA GOLD LOAN

नाशिक (प्रतिनिधी): शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे बुधवारी, २९ डिसेंबर रोजी शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे.

उंटवाडी, जगतापनगर, हेडगेवारनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, गोविंदनगर आदी भागात केलेली विकासकामे, गायकवाड दाम्पत्याच्या प्रयत्नाने दोंदे पूल आणि सिटी सेंटर सिग्नलजवळील पूल या दोन ठिकाणी महापालिकेतर्फे बसविण्यात आलेली संरक्षक जाळी, कोरोना काळात केलेले काम, लसीकरण केंद्रासाठी केलेले प्रयत्न, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची केलेली मदत, स्वच्छता अभियान, समस्या निराकरण मोहीम, वृक्षारोपण, पर्यावरण संदेश, नंदिनी नदी स्वच्छता मोहीम आदी उपक्रम; सिटीलिंक बससेवेची सुविधा आदींचा यात समावेश आहे. श्री गजानन महाराज प्रकट दिन, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, कोजागिरी पौर्णिमा उत्सव आदी धार्मिक कार्यक्रम; शिवसेना शाखा, महिला आघाडी शाखेचे उद्घाटन, मेळावे यासह राजकीय, सामाजिक, धार्मिक सहभागाचे या दिनदर्शिकेत सचित्र दर्शन घडते.

हे ही वाचा:  नाशिक: थकबाकी भरा, अन्यथा कारवाई; महापालिका आयुक्तांचा थकबाकीदारांना अल्टिमेटम

दिनदर्शिका नव्हे तर ही कार्यदर्शिका असल्याची प्रतीक्रिया प्रकाशनावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, वसंत गिते, सुनील बागुल, विनायक पांडे, दत्ता गायकवाड, बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, संजय टकले, यशवंत जाधव, संकेत गायकवाड (देशमुख), प्रथमेश पाटील, हरिष काळे, सूरज टकले, धवल खैरनार, संगिता देशमुख, उज्ज्वला सोनजे, मीना टकले, वंदना पाटील, प्रतिभा पाटील आदी हजर होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates