विद्यापीठाला येईना विद्यार्थ्यांची कीव; एकाच दिवशी दोन ते तीन पेपर

नाशिक (प्रतिनिधी): यावर्षी विद्यार्थ्यांसोबत खूप वेगवेगळे प्रयोग विद्यापीठांनी करून बघितले. ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा घेऊन आधीच खूप गोंधळ घालून परीक्षा कशाबशा उरकल्या नाहीतर. त्यानंतर लगेच निकाल लावण्यात आला व विद्यार्थ्यांची सगळी धावपळ उडवून टाकली.

यातून सगळे सावरतचं होते. त्यात लगेच नापास झालेल्या व गुण कमी आलेल्या विषयांचे असे दोन्हीही ऑनलाईन पेपर एकाचवेळी मंगळवारपासून घेण्यात येणार आहे. विद्यापीठा अंतर्गत तब्बल १५० वेगवेगळे कोर्स सुरू असून त्यातील काही अभ्यासक्रमांचे एकाच दिवशी दोन तीन विषयांचे पेपर ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी ओढाताण होणार आहे.

कोरोनाच्या या अवघड काळामध्ये विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या यामध्ये विद्यार्थ्यांना व शिक्षकांना खूप मानसिक ताण सहन करावा लागला. ऑनलाईन परीक्षेच्या वेळी अनेक तांत्रिक अडचणी आल्या. कधी कधी लॉगइन होत नव्हते तर कधी प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्नचं कोरे येत होते. अशा वेळी विद्यार्थ्यांनी करावे तरी काय? यामध्ये पेपर पूर्ण सोडवून झाल्यानंतर देखील सबमिट होत नव्हते. विद्यार्थ्यांना एकच पेपर तीन तीनदा द्यावा लागला होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790