रेमडेसिव्हीर आणि टॉसिलिझुमॅब औषधे नाशिकमध्ये उपलब्ध

काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करणार…

नाशिक (प्रतिनिधी) : देशात, राज्यात तसेच जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हीर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांचा साठा मर्यादीत असला तरी तो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, ज्या १९ औषध वितरकांकडे ही औषधे उपलब्ध आहेत त्यांची यादी जाहिर करण्यात येत आहे.तसेच औषध वितरणातील होणारा काळाबाजार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर करण्यात येणार असून, या औषधांच्या काळाबाजाराबाबत काही माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्र. 1800222365 वर देण्यात यावी, असे आवाहन नाशिक विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या संदर्भात आज जारी केलेल्या या प्रसिद्धी पत्रकात श्री. भामरे म्हणतात, मुंबई शहरातील काही औषध वितरक व रुग्णालय यांना, मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन या औषधांची उपलब्धता, त्यांचे वितरण व आकारण्यात येणारी किंमत यांची माहिती घेतली. तसेच आयुक्तालयामध्ये मे. सिप्ला व मे. हेट्रो हेल्थकेअर या उत्पादकाचे प्रतिनिधी, वितरक, विक्रेते यांच्या समवेत बैठक घेऊन सध्या असणारा उपलब्ध साठा, भविष्यात उपलब्ध होणारा साठा तसेच वितरण प्रणाली व त्यातील दोष दुर करणे या बाबत सविस्तर चर्चा केली. यासंदर्भात, मुंबई व ठाणे मधील कार्यरत औषध निरीक्षक, सहायक आयुक्त (औषधे), सह आयुक्त (औषधे) यांची बैठक घेण्यात आली. कोरानाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने रेमडेसिव्हीर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या औषधांचे उत्पादन व पुरवठा मर्यादित आहे. त्यासाठी या औषधांची मुबलक प्रमाणात उपलब्धता करून, वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करणे आणि या संदर्भातील काळाबाजार रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, यांनी दिल्या आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: उष्णतेची लाट; नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तापमान ४० अंशांवर !

सदर औषधांचा मुबलक प्रमाणात पुरवठा होण्यासाठी मे. हेट्रो हेल्थकेअर रेमडेसिव्हीर चे उत्पादन हैद्राबाद येथे करीत असून, लवकरच नवसारी गुजरात येथे करणार आहे. तसेच मे. सिप्ला यांचे रेमडेसिव्हीर चे उत्पादन बडोदा, गुजरात येथे सुरू असुन भविष्यात गोवा येथे करणार आहे. मे. मायलॉन लि. या कंपनीला सुद्धा या औषधाचे उत्पादन करण्यासाठी केंद्रशासनाकडून अनुमती मिळालेली आहे व यांचे उत्पादन बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे,त्यामुळे या औषधांचा पुरवठा वाढण्यास मदत होईल. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सदर औषधे महाराष्ट्रभर समप्रमाणात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. तसेच ह्या औषधांचे वितरण काही ठराविक वितरकांकडून न करता, त्यांची विक्री अधिक वितरकांद्वारे करण्याच्या सुचनाही संबंधीत कंपनीला देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रासाठी रेमडेसिव्हीर या औषधाचे साधारणतः 21 हजार 500 व्हाईल्स उपलब्ध होणार आहेत. तसेच टॉसिलिझुमॅब या औषधाची जागतिक स्तरावर अधिक मागणी असल्या कारणाने जगभरात तुटवडा निर्माण झालेला आहे. तरीसुध्दा या औषधाचा जास्तीत जास्त साठा आयात करून जिल्ह्यात अधिक प्रमाणात साठा उपलब्ध करण्यासाठी वितरक कंपनीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत असेही या प्रसिद्धी पत्रकाद्वारे सहआयुक्त श्री. भामरे यांनी कळविले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून नऊ लाख रूपयाला गंडा

हे आहेत वितरक…

पिंक फार्मसी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड: 9371530890, सुर्या मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स: 9371281999, सिक्स सिगमा मेडीकल ॲण्ड रिसर्च लिमिटेड: 9823063095, सुरभी मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स: 9890626624, व्होकार्ट हॉस्पिटल लिमिटेड: 9763339842, पायोनिर मेडिकल: 9011524620, जयराम मेडिकल: 9552501508, सहृदया हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड: 8669370177, हॉस्पिकेअर एजन्सी: 9689884548, भगवती डिस्ट्रीब्युटर्स: 9850986885, सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल: 7588557735, चौधरी ॲण्ड कंपनी: 9545774545, कुचेरीया मेडीकल एजन्सी: 8888803222, ‍शितल फार्मा: 9822057242, रूद्राक्ष फार्मा: 9518314781, पुनम एन्टरप्राईजेस: 9921009001, महादेव एजन्सी: 9989908555, करवा फार्मासुटिकल्स: 9822478110, सरस्वती मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्स: 9422259685,

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790