“महिलांनी आपल्यातील कलागुण शोधावेत”: अभिनेत्री पूनम चौधरी-पाटील

NPA GOLD LOAN

शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

नाशिक (प्रतिनिधी): प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबाची जबाबदारी मायेने सांभाळत असते. त्याचबरोबर आपल्यातील कलागुणांचाही शोध घेत आवडीच्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री पूनम चौधरी-पाटील यांनी केले.

सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनी मंगळवारी, ८ मार्च २०२२ रोजी कर्मयोगीनगर, तिडकेनगर येथील औदुंबर वाटिका उद्यानात कर्तृत्ववान भगिनींचा सन्मान व स्नेहमेळावा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

त्यांनी महिलांना कुटुंब सांभाळून आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचे आवाहन केले. महिला सक्षम आहेतच, त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवावा. कर्तृत्ववान महिलांचा आदर्श घेत समाजासाठी विधायक कार्य करावे, असेही त्या म्हणाल्या. गायकवाड (देशमुख) दाम्पत्याने सहकार्‍यांच्या मदतीने या परिसरात विविध विकासकामे करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. आपण त्यांच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दिली.

हे ही वाचा:  नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट! पाणी काटकसरीने वापरा; महापालिकेच्या सूचना

यावेळी व्यासपीठावर सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), धवलताई खैरनार, संगिता देशमुख, बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, संजय टकले, रवींद्र सोनजे, डॉ. शशिकांत मोरे, नीलेश ठाकूर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक यशवंत जाधव यांनी केले. सूत्रसंचालन रसिका वाणी यांनी केले.

कार्यक्रमास शाखाप्रमुख मयुर आहेर, मीना टकले, रूपाली मुसळे, शीतल गवळी, संध्या बोराडे, प्रतिभा वडगे, कल्पना पाटील, उज्ज्वला सोनजे, वंदना पाटील, संगिता चोपडे, संगिता नाफडे, मिनाक्षी पाटील, श्रुती पिल्ले, वृषाली खैरनार, सुलोचना पांडव, शुभांगी शिसोदे, दीप्ती काळे, अमृता नेरकर, वैशाली देवरे, शैलेश महाजन, दीपक दुट्टे, किरण काळे, पुरुषोत्तम शिरोडे, योगेश नेरकर, संकेत गायकवाड (देशमुख), तेजस अमृतकर, प्रथमेश पाटील, संदीप गहिवड आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हे ही वाचा:  नाशिकरांनो काळजी घ्या: उन्हाचा तडाखा; पारा थेट ३९ अंशाच्या पुढे !

यांचा झाला गौरव:
या सोहळ्यात प्रसिद्ध उद्योजिका अनिता मुरडनर; पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्त्या सुजाता काळे; सायकलिस्ट व सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल देव; कोविड योद्ध्या डॉ. पूनम वराडे, डॉ. हेमलता देशमुख, डॉ. सुविधा वाठोरे, डॉ. भारती गोराणे, डॉ. श्वेता महाजन, डॉ. मृणाल पाटील, मनिषा मिंधे, प्रज्ञा निकम; व्यावसायिक कल्याणी भावे, चित्रा रौंदळ, कविता राणे, स्नेहल सोनजे, दीपा उबाळे, गायत्री मिंधे; शिक्षिका कविता वडघुले, संध्या ठाकरे, प्रीती चौधरी, डॉ. छाया महाले-कस्तुरे, रूपाली पाटील, कांतापुरी गोसावी, माधुरी पवार, वैशाली सुपे यांचा गौरव करण्यात आला. गौरवार्थींच्या वतीने सत्काराला उत्तर देताना नवरचना विद्यालयातील शिक्षिका प्रीती चौधरी म्हणाल्या की, सत्कार्य फाउंडेशनने या दुर्लक्षित भागात अनेक विकासकामे केली. इच्छाशक्ती असल्यास सर्वकाही शक्य आहे हे त्यांनी सिद्ध केले असून, सर्व रहिवाशांनी गायकवाड (देशमुख) दाम्पत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates