महत्वाचे: नाशिक शहरातील या भागांत उद्या (दि. ७) पाणीपुरवठा बंद राहणार !

महत्वाचे: नाशिक शहरातील या भागांत उद्या (दि. ७) पाणीपुरवठा बंद राहणार !

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी विभागातील म्हसरूळ, बोरगड भागात शनिवारी (ता. ७) उर्ध्ववाहिनी गळतीची दुरुस्ती होणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथील म्हसरुळ व बोरगड जलकुंभास पाणीपुरवठा करणारी उर्ध्ववाहीनीला पंचवटी जलशुद्धीकरण केंद्राजवळ आणि आरटीओ ऑफिसजवळ गळती लागली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अवैध सावकार देवरेकडे कोट्यवधींची माया; एसआयटी पथक करणार तपास !

सदर काम तातडीने करणे आवश्यक आहे.

उर्ध्ववाहीनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे म्हसरुळ व बोरगड जलकुंभावरून प्रभाग १ आणि प्रभाग ६ मध्ये पाणीपुरवठा होणार नाही. प्रभाग एकमधील ओंकारनगर, वृंदावननगर, प्रभातनगर, दिंडोरी रोड राणा हॉटेलपर्यंत, म्हसरूळ मखमलाबाद लिंक रोडवरील पूर्ण परिसर, ओमनगर, गणेशनगर, स्नेहनगर, गुलमोहरनगर, शनिमंदिर परिसर, म्हसरुळ गावठाण तसेच…

हे ही वाचा:  नाशिक: अवैध सावकार वैभव देवरेची 20 लाखांच्या बदल्यात 3 कोटी रुपयांची वसूली...

संभाजीनगर, बोरगड आश्रमशाळेजवळील परिसर, आदर्शनगर, एकतानगर, प्रभातनगर परिसर, पेठ रोड, जकात नाका, वेदनगरी, उज्ज्वलनगर तसेच प्रभाग ६ मधील कल्याणी व राजेय सोसायटी, मेहेरधाम, गॅस गोडाऊन, इंद्रप्रस्थ सोसायटी, पेठ रोड, जकात नाका परिसर, नमन हॉटेल परिसर, संत सावतानगर, डीटीपीनगर परिसरात शनिवारी दुपारी व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. रविवारी (ता. ८) सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश निकम यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790