नाशिक: येवल्यात अफगाणी युवकाची गोळ्या झाडून हत्या…

नाशिक: येवल्यात अफगाणी युवकाची गोळ्या झाडून हत्या…

नाशिक (प्रतिनिधी): येवला तालुक्यातील चिचोंडी – बदापुर रोडच्या लगत असलेल्या आद्योगिक वसाहत परिसरात काल (दि.५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची माहिती समोर आली होती.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी सदर मृत व्यक्ती हा अफगाणिस्तान येथील नागरिक असल्याचे समजले.

हे ही वाचा:  नाशिक: वैभव देवरेचा पुन्हा ताबा; खंडणीच्या गुन्ह्यात ४ दिवस पोलीस कोठडी !

सदर व्यक्तीवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती असे मृत अफगाणिस्तानी नागरिकाचे नाव आहे.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”11069,11063,11061″]

सदर व्यक्तीवर गोळी झाडल्याच्या घटनेनंतर चौघा अद्यात इसमांनी एका वाहनातून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती यांना येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या गोळीबारा मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार उशिरा रात्री गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणातील फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790