नाशिक: भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

नाशिक: भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील नाशिक-पुणे महामार्गावरील विजय ममता येथे बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रकने पायी चालणाऱ्या 89 वर्षीय महिलेला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमती गंगु गणेश कुलकर्णी ह्या सेवानिवृत्त आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: उष्णतेची लाट; नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तापमान ४० अंशांवर !

त्यांचे वय 89 वर्ष असून त्या दीप नगर सोसायटी येथे राहत.

बुधवारी (27 एप्रिल) रोजी सकाळी 11 वाजता काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. विजय ममता जवळील एका दुकानात त्या गेल्या होत्या. काम करून परतत असताना विजय ममता जवळची एसबीआय बँकेच्या एटीएम समोर त्यांना एका भरधाव ट्रकने (MH 12- LT 5923) धडक दिली. या धडकेत त्या ट्रकच्या पुढील चाकात अडकून फरफटत पुढे गेल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४०.७ अंश तापमान !

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10564,10561,110548″]

अपघाताची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मयताची ओळख पटल्यानंतर त्यांनी त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या त्यांचा भाऊ रत्नाकर गणेश कुलकर्णी यांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळी बोलावण्यात आले. चेहरा बघितल्यानंतर आपलीच बहीण असल्याचं त्यांनी सांगितलं. उपनगर पोलिसांनी ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790