नाशिक: नदीकिनारी फिरतांना तोल जाऊन पाण्यात पडल्याने युवकाचा मृत्यू

NPA GOLD LOAN
nashik calling

नदीकिनारी फिरतांना तोल जाऊन पाण्यात पडल्याने युवकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नदी किनारी फिरत असताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना गोदावरी नदीकिनारी घडली.

सदर तरुण हा सातपूर येथील रहिवासी आहे.

त्याच्या मृत्यूने कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोनूकुमार रावत (वय 35, रा. ध्रुवनगर, सातपूर, नाशिक) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गात महत्वाचे बदल !

सोनूकुमार हा काल दुपारी गोदावरी नदीच्या किनारी नातेवाईक पुतीनकुमार, सखा रावत व अर्जुनलाल छोटेलाल कोल यांच्याबरोबर फिरायला गेले होते. यावेळी फिरत असताना सोनूकुमार याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक झनकर करीत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिकच्या ‘या’ हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या मित्रांचा राडा; डॉक्टर पुत्राला बेदम मारहाण (CCTV Video)
नाशिक: ७५ हजार रुपये किमतीच्या पैठणी चोरून दोन महिला पसार; प्रकार सीसीटीव्हीत कैद (Video)
नाशिक: सुनेचा संपत्तीवर डोळा; सासू सासऱ्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates