ड्रीम कॅसलजवळ अपघात: दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; महिलेचा मृत्यू

ड्रीम कॅसलजवळ अपघात: दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; महिलेचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): दुचाकीला अद्यात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे.

मखमलाबाद रोडवर ही घटना घडली.

ड्रीम कॅसल रोड वर सध्या मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे.

त्यामुळे या ठिकाणी सिग्नलवर वाहतूक पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी नागरिक करत आहेत.

दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. मखमलाबाद रोड वर विठ्ठल रुक्मीणी मंगल कार्यालयाजवळ गुरुवारी हा अपघात झाला. आशा विश्वास भट (वय ६९, गुरु माउली बंगला, गोरक्षनगर, म्हसरुळ) अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवार (दि.२४) सव्वाच्या सुमारास विश्वास यशवंत भट हे त्यांच्या पत्नी आशा भट यांना घेऊन त्यांच्या टीव्हीएस स्कुटी (एमएच १५ युआर २९६२) हिच्यावरुन मखमलाबाद कडून ड्रीम कॅसल सिग्नलकडून जात असतांना विठ्ठल रुक्मीणी मंगल कार्यालयाजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात, आशा भट यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक: मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड; एकूण ९ मोटारसायकल आणि १९ मोबाईल जप्त !

Loading

हे ही वाचा:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गात महत्वाचे बदल !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates