गाड्या आणि दुकानांची तोडफोड करत सिडकोत दहशत माजविणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड

गाड्या आणि दुकानांची तोडफोड करत सिडकोत दहशत माजविणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड

नाशिक (प्रतिनिधी): शुभम पार्क परिसरात गाड्यांची तोडफोड करत दहशत माजविणाऱ्यांची पोलिसांनी परिसरातून धिंड काढली.

नाशिकच्या शुभम पार्क परिसरात बुधवारी सायंकाळी मद्यधुंद अवस्थेत चार चाकी वाहनं आणि दुकानांमध्ये तोडफोड केली होती.

या प्रकारामुळे परिसरात एकाच गोंधळ उडाला होता.

हे ही वाचा:  नाशिक: उष्णतेची लाट; नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तापमान ४० अंशांवर !

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात पाच संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी चार संशयितांची अंबड पोलिसांनी शुभम पार्क परिसरात धिंड काढली आहे.  शहरातील सिडको परिसरात गाड्या आणि दुकान फोडल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती. उत्तम नगर परिसरातील शुभम पार्क येथे 8 ते 10 जणांच्या टोळक्याने ही  तोडफोड केली होती. या घटनेत 20 ते 25 गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. दोन गटात हा वाद झाला होता. याचा बदला घेण्यासाठी तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी ही तोडफोड करण्यात आली होती. दोन राजकीय गटातील  वादातून ही घटना घडली असल्याची चर्चा परिसरात होती. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हे ही वाचा:  नाशिक: १५ ते २० जणांना तब्बल दोन कोटीहून अधिक रूपयांना गंडा; संशयिताला अटक !

या घटनेतील संशयित वैभव लोखंडे, वैभव गजानन शिरवडे, अविनाश शिवाजी गायकवाड आणि केतन भावसार यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली होती. कोयत्याचा धाक दाखवत या तरुणांनी धुमाकूळ घातला होता. शुभम पार्क परिसरात नागरिकांमधील भीती कमी व्हावी याकरिता संशयित आरोपींची धिंड परिसरात काढल्याच म्हटलं जातं आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790