खाद्यतेलाला वाढीव आयात शुल्कामुळे महागाई

नाशिक (प्रतिनिधी): खाद्यतेल हे जीवनावश्यक वस्तूंपैकी एक आहे. गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत स्वयंपाकासाठी महत्वाचे असणारे खाद्यतेल व त्याचे वाढते दर हे लोकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे खाद्यतेलाच्या भाववाढीने शेतकरी व व्यापारी यांना नफा होत नसून हा भडका केंद्रसरकारच्या भरमसाठ आयात शुल्कामुळे उडाला असल्याचे आरोप व्यापारी वर्गाकडून होत आहेत.

भारत हा आधीपासून खाद्यतेल आयात करणारा देश असून खाद्यतेलावर ४ टक्के आकारले जाणारे आयात शुल्क आता २३ टक्क्यांपर्यंत केले गेले असून, जे देश यापूर्वी निर्यात अनुदान देत होते त्यांनी देखील ५ टक्के निर्यात कर आकारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे खाद्यतेल महागाईला पूर्णपणे केंद्र सरकारची करवाढ जबाबदार असल्याचे समोर येत आहे. दिवाळी, लग्नसराई व हॉटेल्स पुर्ववत सुरु झाल्याने तेलाची मागणी वाढली व यामुळे महागाई अजूनच पेटली. एकतर विदेशातून आयात होणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवरील कर वाढले कि,याचा थेट परिणाम स्वयंपाकघरापर्यंत होत असतो.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: ‘तपस्वी’ बंगला हडपण्यासाठी बिल्डरने दिली ‘सुपारी’! संशयित बिल्डरसह दोघांना अटक

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790