कोविड रुग्णालयांशी संलग्न मेडिकल स्टोअर्समध्ये 2,368 रेमडीसीवीर उपलब्ध – जिल्हाधिकारी

रेमडीसीवीरचा काळाबाजार होत असेल किंवा यासंदर्भात तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या हेल्पलाईन क्रमांक 9766811279 व 8780186682 वर तक्रार नोंदवावी..

नाशिक (प्रतिनिधी): रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा व रूग्णांची होणारी पायपीट तसेच त्याच्या उपलब्धतेबाबत पारदर्शकता यावी या हेतुने  जिल्हा प्रशासनाने भरारी पथकांची नेमणूक केल्यानंतर  आता प्रत्येक मेडिकल दुकानावर  रेमडीसीवीर च्या उपलब्ध साठ्याची व किमतीची माहिती रुग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध होत असून पारदर्शकतेसोबतच त्याच्या वितरणात सुसुत्रता आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४०.७ अंश तापमान !

यासंदर्भात त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयास माहिती देताना मांढरे. म्हणाले की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेमडीसीवीर चा तुटवडा व काळाबाजार होत असल्याची माहिती प्रसारमाध्यमातून येत होती त्या पार्श्वभुमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करून त्यांना भरारी पथकासाठी मनुष्यबळ व वाहनही अधिग्रहित करून देण्यात आले होते. त्यांनंतर ज्या औषधालयांमध्ये ही उपलब्ध आहेत त्यांचीही यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. सध्या भरारी पथक प्रत्येक औषधालय/ हॉस्पिटल्स ला भेट देत असून तेथे उपलब्ध साठ्याची माहिती,  त्याप्रमाणे साठा, झालेली विक्री यांची शहानिशा करत आहेत.  त्यामुळे जिल्ह्यात रेमडीसीवीर चा पुरेसा साठा रूग्णांना वेळेवर उपलब्ध होत असून तक्रारींचे प्रमाणही कमी झालेले आहे, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अवैध सावकार देवरेकडे कोट्यवधींची माया; एसआयटी पथक करणार तपास !

जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये औषध पुरवठा व ऑक्सिजन च्या बाबतीत कुठलीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही. साठेबाजी करणारे व काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. आज  जास्तीत जास्त कोविड रुग्णालयांना इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी  कोविड रुग्णालयाशी संलग्न एकूण 50 मेडीकल स्टोअरमध्ये 2 हजार 368 रेमडीसीवीर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच आज एकूण 1 हजार 666 नवीन इंजेक्शन पुन्हा मिळाले आहेत. ज्या रूग्णांना किरकोळ स्वरूपात   रेमडीसीवीर ची आवश्यकता असल्यास त्यांनी वोक्हार्ट हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, अशोका हॉस्पिटल यांच्या औषधालयांमध्ये ते उपलब्ध आहेत. रेमडीसीवीरचा काळाबाजार होत असेल किंवा यासंदर्भात तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या हेल्पलाईन क्रमांक 9766811279 व 8780186682 वर तक्रार नोंदवावी, असेही यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी मांढरे यांनी जिल्हा माहिती कार्यालयास सांगितले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790