नाशिक (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने येवला टोल नाक्याजवळ मध्यरात्री लाखोंचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील दोन संशयितांना अटक करण्यात आले आहे.
मद्य तस्करांची मोठी टोळी जिल्ह्यात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकमधून तब्बल ९३ लाख ६३ हजार २४० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात भाजपचे नेते विखे पाटील यांचे नाव जोडले गेल्याची माहिती आहे. कारण कारवाईमध्ये जप्त केलेला मद्यसाठा हा विठ्ठलराव विखे पाटील कारखान्यातून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या कारखान्यातील नमुने फोरेन्सिक विभागात पाठवण्यात आले आहेत. हे नमुने सदोष आढळले तर मालकांना चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे.