२ लाखांचा मद्यसाठा चोरीला गेल्याचा बनाव करणाऱ्या दोघांना अटक

नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी मधील परनोड रेकॉर्ड कंपनीचा मद्याने भरलेला ट्रक अकोल्याकडे जात होता. त्यामध्ये ८२ लाखांचे मद्य होते ते मद्य ट्रकच्या मालक व चालकाने चोरी केले. व ट्रक लुटला गेल्याचा बनाव केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. ट्रक मालेगाव येथील एका हॉटेल जवळ थांबायची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने संशयित ट्रक चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कबुली दिली की मद्यासाठा जाऊलके परिसरातील एका गोडाऊन मध्ये लपवला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तो माल जप्त केला. ह्या प्रकरणातील एका संशयिताचे नाव ईजाज खान तर दुसऱ्याचे नाव अझरुद्दीन मोहम्मद सादिक शेख आहे.