१४ सप्टेंबर रोजीचा विभागीय लोकशाही दिन रद्द!

नाशिक (प्रतिनिधी) : प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतु यंदा अनलॉक टप्पा सुरु असला तरी करोना विषाणुच्या संसर्ग रोखण्यासाठी लोकशाही दिन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या १४ सप्टेंबर २०२० रोजी होणारा विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याचे विभागीय महसूल उपायुक्त दिलीप स्वामी यांनी सांगितले.