हृदयद्रावक : पायी जाणाऱ्या साईभक्तांवर काळाचा घाला!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक-पेठ रस्त्यावर चाचडगाव परिसरात पिकअपच्या धडकेत रस्त्याने पायी जाणाऱ्या साईभक्तांचा अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

काल (दि.१०) पहाटे पाच वाजेच्या सुमारास दिंडोरी तालुक्यात असलेल्या पेठकडून नाशिककडे जाणाऱ्या साईभक्तांना एका अज्ञात पिकअपने धडक दिली. या अपघातात मनीष धर्मेश हडपती (१५), अश्विन ईश्वर पटेल (३५, रा. दमन) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्यासोबत असलेले. हरीश बाबुभाई पटेल हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळून फरार झाला. यासंधार्भात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.