हृदयद्रावक:१२ व १४ वर्षीय मुलांची आत्महत्या; कारण जाणून व्हाल थक्क !

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील २ अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाने मोबाईल गेम च्या नादात तर दुसऱ्याने ऑनलाईन परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आत्महत्या केली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील प्रज्योत (वय १२) हा लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण घेत होता. प्रज्योतचे बऱ्याच महिन्यापासून ऑनलाईन शिक्षण सुरु होते, दरम्यान नुकतीच ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली त्यात त्याला कमी गुण मिळाले. यामुळे प्रज्योत निराश झाला व त्याला नैराश्याने ग्रासले. दरम्यान, त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

तर दुसऱ्या बाजूला नाशिक येथील भोई गल्लीत राहणाऱ्या स्वरुपला पबजी मोबाईल गेम खेळण्याचे जणू व्यसनच जडले होते. बुधवारी (दि.९ डिसेंबर) रोजी रात्री स्वरूप नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत झोपायला गेला. सकाळी बराच वेळ झाला तरी तो उठला नाही. म्हणून त्याच्या आईने रूममध्ये जाऊन बघितले तर स्वरूपने गळफास घेतला होता. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.