नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरातील हरिहर डोंगररांगांवर ट्रेकिंगसाठी गेलेला तरुण रस्ता चुकला व तेथेच अडकला. मात्र, पोलीस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याची सुखरूप सुटका करण्यात आली.
पर्यटक नेहमीच त्र्यंबकेश्वर परिसरात ट्रेकींगसाठी जात असतात. त्यानुसार, विनोद दत्ताराम जाधव (वय २३, रा. खोपट, ठाणे) हा एकटाच ट्रेकिंगसाठी सोमवारी (दि.११ जानेवारी) रोजी निघाला. दरम्यान, डोंगर फिरताना, अंधार पडल्याने तो परतीचा रस्ता चुकला. घाबरलेल्या विनोदने वडिलांना फोन केला असता, त्यांनी पोलिसांना याबाबत कळवले. दरम्यान, पोलिसांनी वनविभागाशी संपर्क करून, तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक परिश्रमाने पहाटे ४ वाजेच्या सुमारास तरुणाची सुटका करण्यात आली.