हज यात्रेचे आमिष: ट्रॅव्हल कंपनीकडून ३ कोटी ७८ लाखांची फसवणूक

हज यात्रेचे आमिष: ट्रॅव्हल कंपनीकडून ३ कोटी ७८ लाखांची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी): स्वस्त दरात हज यात्रेला जाण्यासाठी पॅकेज देण्याचे अामीष दाखवत यात्रेकरूंची ३ कोटी ७८ लाख ७७ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांंच्या आदेशान्वये ट्रॅव्हल कंपनीविरुद्ध मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती व मुज्जमिल्ल युसूफ शेख (३६, रा. नुसरत पार्क, मिरजकरनगर, सह्याद्री हॉस्पिटलसमोर, नागजी चौक) यांच्या फिर्यादीनुसार जेहान इंटरनॅशनल टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीचा प्रोप्रायटर मतीन अजिज अहमद मणियार ऊर्फ कादरी (३३) याने हज यात्रेसाठी कमी दरात पॅकेज करुन देतो असे सांगून २०१४ ते १३ डिसेंबर २०१८ या काळात अनेक यात्रेकरुंकडून पैसे घेतले.

ट्रॅव्हल कंपनीचे रहेमान स्कूल, वडाळा रोड येथे कार्यालय होते. शेख यांना स्वस्त दरात हज यात्रेला जाण्यासाठी पॅकेज उपलब्ध करून देतो, असे सांगून, फिर्यादी शेख यांच्यामार्फत २/९/ २०१४ ते १३/१२/२०१८ या काळात बुकींग केले. यापोटी तीन कोटी ६७ हजार ४०० तसेच नसरीबा येथील २३ यात्रेकरुंचे ७ लाख १९ हजार असे एकूण ३ कोटी ७८ लाख ७७ हजार ४०० ऐवढी रक्कम चेक, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर व रोख स्वरूपात स्वीकारली. त्यानंतर कोणत्याही यात्रेकरूला विमानाची तिकिटे काढून न देता फसवणूक केली.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: प्रियकराने पतीला दाखवले पत्नीचे अश्लील फोटो; पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न