स्विफ्ट कारमधून 15 लाख रुपयांच्या चोरीचा फिर्यादीच निघाला संशयित !

नाशिक (प्रतिनिधी): दि. ०५/०२/२०२१ रोजी दुपारी ०२.४५ वा. फिर्यादी मयुर राजेंद्र भालेराव (वय २५ वर्षे, रा. तिवंदा चौक, सोमवार पेठ, नाव दखाजा, नाशिक) यांची मुंबई नाका पोलीस ठाणेचे हद्दीत त्यांच्या स्वीफ्ट गाडीमधुन दरवाजाची काच तोडुन जबरीने १५ लाख रूपये चोरी झाल्याची तक्रार मुंबई नाका पोलीस ठाण्यात केली होती..

सदरची तक्रार होताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांचेसह पोलीस उप आयुक्‍त, परीमंडळ-१, सहाय्यक पोलीस आयुक्‍त विभाग-२,तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी हे तात्काळ घटनास्थळावर रवाना झाले. तसेच पोलीस आयुक्‍त दीपक पांण्डेय्‌, यांनीही दिवसा अश्याप्रकारे घडलेल्या घटनेची गांभीर्याने दखल घेवुन त्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

हे ही वाचा:  निर्दयी आई.. त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या आईनेच केल्याचे निष्पन्न..

त्याअनुषंगाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक, विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक के. टी. रोंदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी व डी.बी. पथक यांचेसह गुन्ह्याचा शोध घेत साक्षीदार तपासले, फिर्यादी यांचा पुर्वहतिहास बघितला असता फिर्यादी हा रौलेट नावाचा जुगार चालविणारा इसम कैलास शहा याचेसाठी काम करीत असल्याचे आढळले. त्यानंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी त्यांच्या पथकासह फिर्यादी व साक्षीदार यांचेकडे लागलीच वेगवेगळ्या पध्दतीने चौकशी केली असता सदरचा प्रकार हा स्वत: फिर्यादी मयुर राजेंद्र भालेराव याने त्याचे साथीदारांसह मिळुन केल्याचे उघडकीस आले. त्याचे कैलास शहा याच्याशी झालेल्या भांडणाच्या रागातुन त्याचा वचपा काढण्यासाठी जबरी चोरीचा बनाव करण्याचा कट रचला.

हे ही वाचा:  नाशिक शहर: आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या

कैलास शहा याचा बांधकाम व्यवसायातील भागीदार संदीपसिंग सलोजा यांनी दिलेली रकमेचा अपहार केल्याची कबुली दिलेवरून, नमुद गुन्ह्यात मयुर राजेंद्र भालेराव याचा साथीदार रामा सुंदर शिंदे अशा दोघांना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन गुन्ह्यातील रक्‍कम हस्तगत करण्यात आली आहे. सदरचे आरोपी पोलीस कोठडीत असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी करीत आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून सोमेश्‍वर धबधब्यात पडल्याने युवतीचा मृत्यू