सोशल मीडियाचा गैरवापर ; चक्क व्हाॅट्सअप व्हिडिओ कॉलवरून विनयभंग

नाशिक (प्रतिनिधी) : सोशल मीडियाच्या चांगल्या वापरासोबतच गैरवापरात देखील वाढ झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरवापराच्या घटना समोर येत आहेत. एका अज्ञात इसमाने व्हाॅट्सअॅप क्रमांक मिळवून, पीडित महिलेला व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील कृत्य करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

शहरात रविवारी (दि.२५) रोजी एका अज्ञात व्यक्तीने पीडित महिलेच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला. पीडित महिलेने कॉल उचलताच संशयिताने अश्लील कृत्य करत, नग्नावस्थेत महिलेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात या अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंगाची फिर्याद नोंदवली आहे.