सोबतच मद्यप्राशन करत होते; वाद झाला अन, केला खून !

नाशिक (प्रतिनिधी) : आनंदवली परिसरात दारू पिण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. म्हणून  एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (दि.५ जानेवारी) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान, आनंदवली परिसरातील महापालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागे २ मित्र मद्य प्राशन करत होते. दरम्यान, संशयित आरोपी रुपेश छोटूलाल यादव व मोहन विष्णू लाहिरे (वय २९, रा.चुंचाळे) या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संशयित रुपेशने मारहाण करत, मोहनला जमिनीवर खाली पाडले व दगड डोक्यात घालून त्याचा खून केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.