नाशिक (प्रतिनिधी) : सैन्यदलामध्ये जवानांना राखीव असलेल्या मद्याची खुल्या मार्केटमध्ये विक्री करणाऱ्या देवळाली कॅम्पमधील मद्य तस्कर प्रशांत लिपने याला अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मिलिटरी सीएसडी कॅन्टीनमध्ये जवानांसाठी राखीव ठेवण्यात आलेला मद्य पुरवठा खुल्या प्रकारे मार्केटमध्ये विकला जात आहे अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने हायवे वरील एका हॉटेलसमोर लेखानगर येथे सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केल्यास त्यांना सीएसडी विदेशी मद्य आढळून आले. गाडी आणि मद्यसाठा मिळून एकूण १० लाख ४२ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला होता.