नाशिक (प्रतिनिधी) : उपनगर परिसरात राहणाऱ्या ५६ वर्षीय वृद्धाचा सॅनिटायझरचा स्फोट होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनिल जयंतीलाल सूचक असे या इसमाचे नाव आहे. काल (दि.०१) दुपारच्या वेळी बॉटल मध्ये सॅनिटायझर भरत असतांना अचानक सॅनिटायझरने पेट घेतला आणि भडका झाला. यामध्ये अनिल सूचक ६८ टक्के भाजले गेल्याने त्यांना त्वरित उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
बाटलीत सॅनिटायझर भरतांना स्फोट; एकाचा मृत्यू!
3 years ago